BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भवानी पेठेतून सात किलो गांजा जप्त, एकाला अटक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- भवानी पेठेतील सय्यद शहाबाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे सात किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा गांजा जप्त करत त्याला अटक केली.

इसाक जैनुद्दीन शेख (वय 50) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि त्यांचे कर्मचारी समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना आरोपी एका मोपेड दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून दुचाकी तपासली असता डिक्कीत 713 ग्राम वजनाचा गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

HB_POST_END_FTR-A4

.