Pune SEX Racket News :  पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलवर पोलिसांचा छापा; तिघांना अटक तर तीन तरुणींची सुटका

एमपीसी न्यूज – पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट ग्राहकाच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकून वेश्या व्यवसाय करण्यासाठी जमलेल्या तीन तरुणींची सुटका केली तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मालकासह तिघांना अटक केली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दौंड मधील बोरीभडक गावच्या हद्दीतील त्रिमूर्ती हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या सहाय्याने या हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी त्यांना या ठिकाणी तीन तरुणी वेश्या व्यवसाय करताना आढळल्या. पोलिसांनी या तीन तरुणींची सुटका करत हॉटेल चालकासह तिघांना अटक केली.

यापूर्वीही ग्रामीण पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील पांढरेवाडी गावच्या हद्दीतील अनुराधा हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली होती तर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.