BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे शहीद मेजर शशीधरन व्ही. नायर यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना

223
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर हे शहीद झाले. तर आज (शनिवार) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहीद मेजर शशीधरन व्ही. नायर यांचे पार्थिव पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले.

.

यावेळी शशीधरन यांच्या पत्नी तृप्ती, आई लता आणि बहीण सीना तसेच लष्कराच्या अनेक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना मानवंदना दिली. तर यावेळी अमर रहे …अमर रहे …शशीधरण …अमर रहे… अशा घोषणा देण्यात आल्या . उद्या सकाळी खडकवासला येथील घरी नेण्यात येणार असून रविवार (सकाळी 10) नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: