Student Felicitation: शाहू वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सत्कार

एमपीसी न्यूज : शाहूनगर येथील शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (Student Felicitation) यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. व्याख्याते व संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी “यश शिखरे गाठताना ….” या विषयावर व्याख्यान दिले.

. राजेंद्र घावटे म्हणाले की, “केवळ जास्त गुण मिळवले म्हणजे शर्यत जिंकली असे होत नाही. यशस्वितेचे मोजमाप हे परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसते. मार्कवंत जरूर व्हा , पण गुणवंत होणे जास्त महत्वाचे आहे. जगामध्ये अनेक प्रकारे ज्ञान उपलब्द्ध आहे. मिळवलेल्या ज्ञानावरच माणसाची उंची ठरते.(Student Felicitation) अनेकांनी भौतिक दृष्ट्या कमी गुण मिळवूनही आयुष्यात भव्य दिव्य केले आहे. आयुष्य घडवणारे नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करतात. अपयशाने खचून जात नाहीत. पारंपरिक ठराविक अभ्यासक्रमाबरोबरच अनेक वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या संधी उपलब्ध आहेत. असे क्षेत्र निवडा की ज्याचा समाजाला आणि राष्ट्राला उपयोग होईल. कुटुंबाला अभिमान वाटेल असे क्षेत्र निवडा… आवडीचे क्षेत्र निवडले तर पारंगत होणे लवकर साध्य होते.. आणि धन वैभव सन्मान आपोआप चालून येतात. ज्ञानग्रहण, सचोटी, प्रामाणिकपणा, कष्ट, चिकाटी आदी बाबी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहेत”.

Pune News: कोंढव्यात गांधी विचारांच्या पंचसूत्रीची शपथ

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकिशन मुत्याल होते. यावेळी राजगोंडा पाटील, राजाराम वंजारी, गोपाळ सैंधाणे, राजाराम रायकर, दयानंद कांबळे, नरेंद्र जयसिंगपूरे, अनिता पाटील आदी उपस्थित होते.(Student Felicitation) प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पगारे यांनी केले. मनीषा पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.