Pune : कोकण परंपरेतील ‘शक्ती -तुरे ‘ महामुकाबल्यात पुणेकर दंग !

एमपीसी न्यूज- अस्सल कोकणाच्या परंपरेतील शाहीरी अनुभव असलेल्या ‘शक्ती -तुरे’ महामुकाबल्याचा अनुभव घेताना पुणेकर दंग झाले ! शिवसेना पर्वती विभाग आणि शिवसेना पर्वती मतदारसंघ विभाग प्रमुख सुरज लोखंडे आयोजित या जंगी महामुकाबल्याने पुणेकरांची मने जिंकली.

शाहीर पूनम आगरकर आणि शाहीर सुरज हरेकर यांच्या ‘शक्ती- तुरे’ संघात हा महामुकाबला झाला. पारंपारिक स्तवन, गण, गवळण, पद याने कार्यक्रमाला रंगत आणली. खासदार संजय काकडे आणि सुरज लोखंडे यांनी लोकनृत्य कलाकारांचा सत्कार याप्रसंगी केला. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख खडकवासला मतदारसंघ निलेश गिरमे () हे उपस्थित होते.

‘शक्ती’ म्हणजे आदी माया पार्वतीचे रूप तर ‘तुरे’ म्हणजे श्रीकृष्णचे रूप. प्रथम शक्तीवाले यांनी नृत्य सादर केले, त्यानंतर तुरेवाले यांनी आपले सादरीकरण केले. महिला शाहीर चमूचे (शक्तीवाले) नेतृत्व शाहीर पूनम आगरकर यांनी केले. तर पुरुष शाहीर चमूचे नेतृत्व सुरज हरेकर ( तुरेवाले ) यांनी केले.

पुण्यातील कोकणवासीयांचा मेळाच जणू या निमिताने गणेश कला क्रीडा केंद्र येथे भरला होता. सुरज लोखंडे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.