Pune News : श्याम देशपांडे यांचा भाजप मध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. (Pune News) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी  आज प्रवेश केला. देशपांडे हे पुणे महापालिकेवर तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

 

उद्धव ठाकरे यांनी 2022 मध्ये मुंबईतील एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे 2022 मध्ये पक्षातून हकालपट्टी केली होती

Pimpri News : स्वयंसिद्धा व गझल पुष्प च्या वतीने महिला दिनानिमित्त लोकसंस्कृतीतील  स्त्री साहित्य” कार्यक्रम 

 

देशपांडे हे 2000-2012 या कालावधीत कोथरूड भागातून (Pune News) नगरसेवक होते तर 2008-2009 मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. आता भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.