Pune : पुणे पोलीस दलातील कर्मचारी महिलेचा लाजिरवाणा प्रताप; मित्राच्या पत्नीला परपुरूषासोबत संबंध ठेवण्यासाठी धमकी

TakaTak Gang

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलातील (Pune) एका कर्मचारी महिलेचा अजब प्रताप समोर आला आहे. तिने मित्राच्या पत्नीला परपुरूषासोबत संबंध ठेवण्यासाठी धमकवल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी याबाबत कारवाई करत संबंधित कर्मचारी महिलेचे निलंबन केले आहे.

याबाबत माहिती अशी की, तिने तिच्या मित्राच्या पत्नीवर पुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. जर तू परपुरषाबरोबर शारीरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार करु, अशी धमकी दिली.

Pune : क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने कामे करावीत- अजित पवार

आम्ही एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो. त्यात 9 कोटींचा व्यवहार झाला आहे. त्यातील तुझ्या नवऱ्याला 40 ते 50 लाख रुपये मिळणार आहेत, असे पोलीस महिलेने पीडित महिलेला सांगितले.

पीडित महिलेने याबाबत गडहिंग्लज पोलीस (Pune) ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत संबंधित पोलीस महिलेचे निलंबन केले आहे. त्या पोलीस महिलेची इन्स्टास्टार म्हणूनही ओळख आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share