Pune : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार शंतनू गोयल यांनी स्वीकारला

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी शंतनू गोयल यांची नियुक्त झाली असून त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला. या पदावरील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.

गोयल यांनी शुक्रवारी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अनिल मुळे यांनी पालिकेतील विविध विभाग, क्षेत्रिय कार्यालये, पालिका सभा कामकाज, महापौर तसेच अन्य पदाधिकारी व पालिकेतील विविध समित्या, समित्यांचे कामकाज इत्यादीबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.