_MPC_DIR_MPU_III

Pune : साहेबांनी ‘डोळे वटारताच’ पुण्यातील अजितदादा समर्थकांची तलवार म्यान !

एमपीसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्याने पुण्यातील त्यांचा गट फुटण्याच्या स्थितीत होता. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. शरद पवार यांनी ‘डोळे वटारताच’ अजितदादांसोबतच त्यांच्या समर्थकांनीही ‘तलवार म्यान’ केली आहे. यामधून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी फुटू देणार नसल्याचा संदेश पवारांनी दिला आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यातील काही मंडळींनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छाही दिल्या होत्या. आपण अजितदादांसोबत असल्याचेही त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भल्याभल्यांना चितपट करणारे राजकारणातील खरे वस्ताद शरद पवार यांच्यापुढे कुणाची डाळ शिजली नाही.

पुणे महापालिकेत अजित पवार यांना मानणारा मोठा गट आहे. तसाच त्यांच्यापेक्षा वरचढ असा दुसरा गट शरद पवार यांचाही आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सोसायट्या या स्थानिक संस्थांची माहिती शरद पवार घेत असल्याचे बोलले जात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.