Pune : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शरद पवार उपस्थित 

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला होणार सुरुवात

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या (Pune) अध्यक्षतेखाली होत आहे.पण या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली आहे.त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

 पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक दुपारी एक वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे,सुनील शेळके, दत्तात्रय भरणे यांच्यासह अधिकारी उपस्थित आहे.मात्र अचानकपणे अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थितीत लावल्याने अनेक चर्चाना उधाण आले (Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.