Pune: राज्य सरकार गोंधळलेलं, शरद पवार मार्गदर्शन करत असल्याचे दिसत नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

Pune: Sharad Pawar does not seem to be guiding the state government, says Chandrakant Patil रद पवार यांच्या कामाचा वेग प्रचंड आहे. त्यांचा प्रशासनावर वचक आहे. पवारांवर टीका करतो ते काय त्यांच्याबद्दल अनादर म्हणून नाही, तर त्यांचा आदर ठेवूनच करतो.

एमपीसी न्यूज- कोरोना आणि चक्रीवादळामुळे राज्य सरकार सध्या गोंधळलेले आहे. कोणताही निर्णय होत नाही. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून येत नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी टीकास्त्र सोडले.

सभागृह नेते धीरज घाटे यांनी मु. पो. आंजर्ले (तालुका, दापोली, जिल्हा, रत्नागिरी) येथे चक्रीवादळात पडझड झालेल्या घरांसाठी पत्रे, घरांवर टाकायला कौले व अन्नधान्य देण्याचा संकल्प सोडला.

रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सारसबाग जवळ याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे शहराचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्वीकृत नगरसेवक रघुनाथ गौडा, नगरसेवक सुशील मेंगडे, झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार उपस्थित होते.

10 लाख रुपयांचे साहित्य मदतीच्या स्वरूपात आंजर्ले या गावासाठी देण्यात आले. धीरज घाटे, आनंद पाटील, ओंकार कुलकर्णी व प्रशांत सुर्वे ही मदत घेऊन प्रत्यक्ष आंजर्ले या गावी रवाना होणार आहोत. निलेश ढोबळे याच्या मार्फत ग्रामस्थांकडे ही मदत सुपूर्द करण्यात येणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या कामाचा वेग प्रचंड आहे. त्यांचा प्रशासनावर वचक आहे. पवारांवर टीका करतो ते काय त्यांच्याबद्दल अनादर म्हणून नाही, तर त्यांचा आदर ठेवूनच करतो.

या वयात ते कोकणात चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी गेले. अजित पवार किंवा जयत पाटील गेले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री तर पहिल्या दिवशीच काही तासंच एका ठिकाणी गेले. पवार तर दोन दिवस गेले, मुक्कामी राहिले. या वयातही पवार यांना मानलंच पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही नागरिकांना मिळाला नाही.

तातडीची म्हणून किमान दहा-पंधरा हजार रुपये मदत करण्यात यावी. महापुरावेळी आम्ही मदत दिली होती. ज्याला भांडी आणि कपड्यांसाठीची मदत असे म्हणतो.

किमान दोन-तीन महिन्यांचे रेशन लगेच देण्यात यावे. पण, तुम्ही काहीच देणार नाही आणि विरोधी पक्षाने मागणी केल्यावर म्हणणार की राजकारण करत आहेत, हे बरोबर नसल्याचेही पाटील यांनी निक्षून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.