Pune : शरद पवार यांचावर ईडी गुन्हा दखल करण्याचा इव्हेंट करून प्रसिद्धी मिळवताहेत -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने त्याचा इव्हेंट करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रकार सुरू आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. भाजप शहर कार्यालयात चंद्रकांत पाटील यांची शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, आमदार दिलीप कांबळे, भीमराव तापकीर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक हेमंत रासणे, दीपक पोटे उपस्थित होते.

ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही. 2010 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यावेळी पावर यांचा सल्ल्यावर सरकार चालायचे. छगन भुजबळ यांना अटक केली, तेव्हा काही केले नाही, पवार यांच्यावर गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादीतर्फे प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही चौकशी राज्य सरकारने लावली नाही, असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.