Pune : जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वाट बघतात !

एमपीसी न्यूज – राजकारणात भल्याभल्यांना चितपट करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाट बघण्याची वेळ आली. उध्दव ठाकरे न आल्याने अखेर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

मांजरी येथे सकाळी 11 वाजता 43 वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सभा आयोजित करण्यात आली होती. चाणाक्ष पवार मात्र 20 मिनिटे आधीच कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांशी चर्चा केली. पवार यांचे स्टेजवर आगमन होताच ऊस उत्पादक शेतकरी, प्रमुख पाहुण्यांनी उभे राहून टाळ्या वाजवीत त्यांचे स्वागत केले.

मात्र 11 वाजले तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे न आल्याने अखेर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थिती लावली. त्यांनी त्याच्या नावाची पाटी बदलल्याने खमंग चर्चांना उत आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.