BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लोकसभा निवडणुकीत बारामतीला आम्ही सुरुंग लावणार – रामदास आठवले

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीला जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. बारामती मतदारसंघ हा पवारांचा गड असून यंदा पवारांच्या गडाला आम्ही सुरुंग लावणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. महायुतीच्या उमेदवार कांचन कूल या प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

रामदास आठवले म्हणाले की, मागील निवडणुकीत बारामतीमधून रासपचे महादेव जानकर यांनी महायुतीकडून निवडणूक लढविली होती. पण त्यावेळी त्यांना कपबशी चिन्ह मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. जर त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असती तर ते निश्चित विजयी झाले असते. मात्र यंदा महायुतीकडून बारामतीमधून कांचन कूल या निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तेथील जनता त्याच्या पाठीशी असल्याने त्यांचा विजयी निश्चित आहे.

2014 ची निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढविली आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. यंदा आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवित असल्याने आम्हाला 350 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like