Pune : रेल्वेतील आसनांवर शेविंग क्रिम टाकुन आसने केली खराब

पुणे रेल्वे स्थानकात भिकारी गर्दुल्ल्यांची दहशत

एमपीसी न्यूज- पुणे रेल्वे स्थनाकावर भिकारी गर्दुल्ल्यांची दहशत निर्माण झाली असून अनेक मेल एक्स्प्रेस गाड्यांमधील आसनांवर स्थानकातील भिकारी व गर्दुल्ले गाडी सुटण्याअगोदर आपल्या कडील घाणेरड्या वस्तु, पेपर, कपडे टाकुन आसने अडवुन ठेवतात. या भिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पुणे शहरातील रेल्वे स्थानक भिकारी व गर्दुल्ल्यांच्या विळख्यात सापडले आहे. पुणे रेल्वे स्थानकातुन मुंबई तसेच राज्यात व राज्याबाहेर जाणा-या अनेक गाड्यांच्या डब्यातील आसनांवर स्थानकातील भिकारी व गर्दुल्ले गाडी सुटण्याअगोदर येऊन बसुन राहतात तर काही आसनांवर आपल्या कडील घाणेरड्या वस्तु, पेपर, कपडे टाकुन आसने अडवुन ठेवतात. त्यानंतर प्रवाशांकडून पैसे उकळतात.

गाडीत प्रवासी आल्यानंतर हे लोक त्या प्रवाशास आसनांवर बसु देत नाही, आसनांवर बसायचे असेल तर पैसे द्यावे लागतील. असे बोलुन हे भिकारी व गर्दुल्ले प्रवाशांकडुन पैसे उकळतात. प्रवासी प्रवास सुखकर व्हावा म्हणुन सुरुवातीलाच भांडणतंटा नको म्हणून ह्यांच्या अरेरावीला बळी पडतात.

मंगळवारी दुपारी अशाच एका माथेफिरुने पुणे रेल्वे स्थानकातुन सुटणा-या 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस मधील पुरुषांच्या पासधारक डब्यातील सुमारे दहा आसनांवर शेविंग क्रिम टाकुन आसने खराब केल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी भिकारी गर्दुल्ले ह्यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.