Pune : कथक नृत्याच्या सादरीकरणाने शीला मेहता यांनी जिंकली पुणेकरांची मने

एमपीसी न्यूज – सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात कथक नृत्यांगना विदुषी शीला मेहता यांनी कथक नृत्याच्या ‘निमित्त ‘ या सादरीकरणाने सोमवारी (दि.17) पुणेकरांची मने जिंकली.

भारतीय विद्या भवन येथे पार सोमवारी (दि.17) पार पडलेल्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांत शीला मेहता आणि त्यांचे शिष्य अरिशिया पोनेट, मानसी सोमय्या, सुशांत गौरव यांनी बहारदार नृत्यांचे सादरीकरण केले. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स् , इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नृत्य गुरु शमा भाटे, पं. सुहास व्यास,इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स्चे विभागीय व्यवस्थापक एन.के.मलिक उपस्थित होते.

अरिशिया पोनेट यांनी पं. बिरजू महाराज यांचे अर्धनरेश्वर नृत्य सादर केले. मानसी सोमय्या , सुशांत गौरव यांनी शिवशक्ती नृत्य सादर केले. पुरुष आणि स्त्री व्यक्तिमत्वाचे एकत्र प्रतिक बनलेल्या शिखंडी हा महाभारतातील युद्धात भीष्माचार्यांच्या पराभवाचे निमित्त ठरला, कथाकार शैलीत महाभारतातील हा प्रसंग चरणी परंपरेच्या अंगाने नृत्य करत शीला मेहता यांनी सादर करत पुणेकरांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजदीप्ती पावडे यांनी केले. प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले तर शमा भाटे, पं. सुहास व्यास यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.