_MPC_DIR_MPU_III

Pune: पुणे विभागात 10,041 स्थलांतरित मजुरांना निवारा तर 61,179 मजुरांच्या भोजनाची सोय

Pune: Shelter for 10,041 migrant laborers and meals for 61,179 laborers in Pune division

एमपीसी न्यूज –  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 93 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 11 कॅम्प असे  पुणे विभागात एकूण 160 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

या कॅम्पमध्ये 10 हजार 41 स्थलांतरित मजूर असून 61 हजार 179 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील 45  हजार 302 मजूरांना घेऊन पुणे विभागातून 36 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.