Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांना पुणे महापालिकेतर्फे अभिवादन

एमपीसी न्यूज- शिवजयंतीनिमित्त आज, बुधवारी सकाळी महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिकेच्या वतीने एसएसपीएमएस शाळेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

तत्पूर्वी पुण्याचे ग्राम दैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर एसएसपीएमएस शाळेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, लालमहाल येथील जिजामाता व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोथरूड येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महापालिकेच्या नव्या आणि जुन्या सभागृहातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधीपक्ष नेते दीपाली धुमाळ, नगरसेवक योगेश समेळ, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका स्मिता वस्ते, हर्षाली माथवड, वासंती जाधव मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.