Pune News: छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्याने शिवसेनेतर्फे भर पावसात आंदोलन

Pune: Shiv Sena agitates in rains over removal of statue of Chhatrapati Shivaji Maharaj जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, कर्नाटक सरकारचं करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणाही शिवसेनेतर्फे भगवे ध्वज उंचावून देण्यात आल्या.

एमपीसी न्यूज – बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटवून छत्रपतींचा अपमान केला आहे. या प्रकाराविरोधात रविवार दुपारी 1 वाजता टिळक पुतळा मंडई येथे भर पावसात आंदोलन करण्यात आले. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले.

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतानाही शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यात आला. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. केवळ महाराजांच्या नावांनी मत मागण्यासाठी भाजप नाव घेत आहे. ज्या ठिकाणी पुतळा हटविण्यात आला आहे, तो तातडीने बसविण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही पुतळा बसविल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, कर्नाटक सरकारचं करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणाही शिवसेनेतर्फे भगवे ध्वज उंचावून देण्यात आल्या.

या आंदोलनात गजानन पंडित, चंदन साळुंखे, रुपेश पवार, ज्योतिबा शिर्के, नितीन परदेशी, संतोष भुतकर, संदीप गायकवाड, उमेश गलींदे, स्वाती कथलकर, प्रसाद काकडे, रवी निंबाळकर, योगेश खेंगरे, निलेश ढवळे, सुनील गायकवाड, व्यंकटेश पवार, विशाल कोंढरे, सागर भोसले, मुकेश दळवी, मुकुंद चव्हाण, विक्की तळेकर, हर्षद ठकार, मनीषा धरणे, प्रसाद चावरे, बाबू परदेशी, दत्ता देशमुख, कैलास चतांदर, हनुमान दगडे, भाऊ शिंदे, पंकज बरीदे आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.