Pune : विधानसभेसाठी शिवसेना-भाजपची युती होणार-चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची लवकरच युती होणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर, शिवाजीनगर भागात लागलेल्या निनावी फलेक्सबाबत तुम्हाला उमेदवारी हवी का?, असे सांगून उत्तर देणे त्यांनी टाळले.

निवडणूक आयोगाकडून राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया देखील तारखेनुसार जाहीर केली आहे. मात्र, असे असले तरी अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार कि नाही? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

तसेच या दोन्ही पक्षांनीही अदयाप युतीबाबत जाहीर माहिती दिलेली नाही. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडले असल्याचे समजत आहे. मात्र, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज शिवसेना आणि भाजप यांची युती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.