Pune : पुण्यात शिवसेना, काँगेसच्या कार्यकर्त्यांनाही हवाय सत्तेचा लाभ!

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. तर, याच पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आहेत. त्यांच्या जोडीला कॅबिनेट मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आहेत. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचीच निवड निश्चित मानली जात आहे.  त्यामुळे तीन पक्षाची सत्ता असताना राष्ट्रवादीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँगेसच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ हवा आहे.

पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि काँगेसचे अस्तित्व टिकविण्यासाठी एक -एक मंत्रिपद देणे गरजेचे होते. मात्र, तो केला गेला नाही. त्यामुळेच भोरमध्ये काँगेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी निषेध व्यक्त केला. तरिही न्याय मिळत नसल्याने पुणे शहरात येऊन काँगेस भवनमध्ये तोडफोड केली.

विश्वजित कदम यांना मंत्रिपद मिळण्यासाठी पुण्यातील शिष्टमंडळाने प्रयत्न केले होते. पण, थोपटे यांच्यासाठी शब्द टाकला नाही. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांचा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.