Pune : शिवसेना नगरसेवकांचे एक महिन्याचे  मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

एमपीसी न्यूज – सध्या संपूर्ण जगात कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन या संकटाचे निवारण करण्यासाठी झटत आहे. त्यामध्ये आपलाही थोडा खारीचा वाटा असावा म्हणून पुणे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपले एक  महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे महापालिकेतील  शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी ही माहिती दिली.  कोरोनाच्या संकटामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी  शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यातून खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपले एक  महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.   या निर्णयानुसार गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, प्रमोदनाना भानगिरे, विशाल धनवडे, नगरसेविका संगिता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट हे सर्वजण आपले एक  महिन्याचे मानधन देणार आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक उद्योजक, सेलिब्रेटी आणि राजकीय नेतेमंडळींनी मदतीचा पुढे केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.