Pune : नालेसफाई होत नसल्याने शिवसेनेने क्षेत्रीय कार्यालयात टाकला कचरा

Shiv Sena dumped garbage in the field office due to non-cleaning

7 दिवसांत नालेसफाईचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

एमपीसी न्यूज – जनता वसाहत ते सुयोगनगर, पांच पांडव सांस्कृतिक हॉलपासून ते निलज्योतीपर्यंतचा नाला वारंवार मागणी करूनही साफ होत नसल्याने शिवसेनेतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी शिवाजीनगर – घुलेरोड क्षेत्रीय कार्यलयात कचरा टाकला.

शिवाजीनगर विधानसभा विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान येत्या 7 दिवसांत हा नाला साफ करण्याचे लेखी आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरवर्षी हा नाला पावसाळ्याआधी साफ करतात. परंतु, या वर्षी अनेकदा तक्रार करूनही नाला साफ झाला नाही. पुणे महापालिकेच्या ठेकेदाराचे काम अतिशय संथगतीने चालू होते. नाल्याची सफाई वर वर केली जात आहे. तसेच नाल्यातील साचलेली घाण जवळच टाकली जात होती. पाऊस सुरू झाला की ही घाण नाल्यातच जाते. त्यामुळे नाला पुन्हा तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.

त्यामुळे हा नाला तातडीने साफ न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची महापालिकेतर्फे कोणतीही दाखल घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कार्यकारी अभियंता पुणे महापालिका यांच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांनी कार्यालयातच कचरा टाकून राग व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like