Pune : पुणेकरांवर लादण्यात आलेल्या पाणीपट्टी- कर दरवाढीला शिवसेनेचा विरोध -पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज – महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या 2020 – 21 च्या बजेटमध्ये पुणेकरांवर लादण्यात आलेल्या पाणीपट्टी -कर दरवाढीला शिवसेनेचा विरोध असल्याचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मंगळवारी सांगितले.

महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या असत्या तर महापालिकेचे उत्पन्न निश्चित वाढले असते. प्रशासन व सत्ताधारी पुणेकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही, खड्डेमुक्त रस्ते देऊ शकत नाही, वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करत नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा काहीच ठोस उपाययोजना राबवू शकत नाही.

अशा अनेक नागरी सुविधांपासून पुणेकरांना वंचित ठेवले जात आहे. तरीही पुणेकरांवर कर वाढ लादण्यात आली आहे. त्याचा शिवसेना निषेध करीत असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तर, दरवाढीची अंमलबजावणी पुणेकरांच्या भावना विचार न करता करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.