Pune : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्व धर्मीय नागरिकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारास तयार – शिवसेना

Shiv Sena ready for cremation on the bodies of all religious citizens who died due to corona

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यास शिवसेना तयार आहे. हिंदूंसह मुस्लिम आणि इतर सर्व धर्मांच्या पार्थिवावर त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यास शिवसैनिक तयार आहेत. पुणे महापालिकेने ही जबाबदारी आम्हाला द्यावी, अशी मागणी पुणे शहर शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, सहसंपर्क प्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे, नगरसेवक विशाल धनवडे उपस्थित होते.

कोरोनामुळे मृत पावलेल्या मुस्लिम धर्मीय व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यास महापालिकेने परवानगी दिलेल्या एका संघटनेला आता मनाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. मृतात्मे आणि पार्थिवाच्या बाबतीत धर्मापेक्षा मानवता महत्त्वाची आहे.

त्यामुळे कोणत्याही समाजाच्या नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही शिवसैनिक तयार आहोत. त्यासाठी आयुक्तांनी आम्हाला परवानगी द्यावी, असे जावेद खान म्हणाले.

कोरोनामुळे आतापर्यंत 361 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, शहरात कोरोनाचे 7 हजार 265 रुग्ण झाले आहेत. तसेच 4 हजार 505 रुग्ण बरे झाले आहेत. या महिन्यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी मोठ्या प्रमाणात ठणठणीत रुग्ण बरेही होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.