Pune : ‘शिवरायांची दुर्गरत्ने’ छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

एमपीसी न्यूज- दुर्गसंवर्धन व गडकिल्ले यांची माहिती देणारे श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवरायांची दुर्गरत्ने’ या छायाचित्र प्रदर्शनाचे गुरुवारी (दि. 1) उदघाटन करण्यात आले. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले आहे.

यावेळी श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, फर्जद चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर तसेच शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन 1 ते दि. 4 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत रसिकांना पाहता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.