Pune : शिवाजीनगर एसटी बस स्थानक वाकडेवाडी येथील नव्या जागेत स्थलांतरित

एमपीसी न्यूज- मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानक सोमवार (दि. 30) पासून वाकडेवाडी इथल्या नवीन जागेमध्ये स्थलांतरित झाले आहे. सरकारी दूध योजनेच्या जागेत उभारण्यात आलेल्या स्थानकातून आता एसटी बसेसची ये जा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना शिवाजीनगरऐवजी वाकडेवाडी येथे जावे लागणार आहे.

नवीन जागेमध्ये 20 फलाट तयार केले असून, शेडही उभारण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर स्थानकातून मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात दररोज 1400 गाड्यांची ये-जा होते. या बस आता वाकडेवाडी स्थानकातून सुटतील. मात्र एसटीचे आगार आणि वर्कशॉप शिवाजीनगरलाच असणार आहे.

शिवाजीनगर आगाराच्या बस शिवाजीनगरच्या जुन्या आगारातूनच सुटतील. त्या बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना वाकडेवाडी स्थानकातच जावे लागेल. तर, बाहेरच्या आगारातील बस थेट वाकडेवाडीला येणार आहेत अशी माहिती शिवाजीनगर आगारप्रमुखानी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.