Pune News : शिवभक्तांच्या अपघात प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज- ताथवडे येथे शिवभक्तांच्या टेम्पोला (Pune News) झालेल्या अपघात प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी  ट्रक चालक व क्लिनरला अटक केली आहे.

याप्रकरणी सागर भागू कोंडभर (वय 34, रा. शिलाटणे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक नामदेव विनायक पाटोळे (वय 36), क्लिनर प्रशांत विकास बनसोडे (वय 26, दोघे रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह ट्रक मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : गड आपल्याबरोबर कायम असून सिंहगड देखील आपल्यासोबत :  आमदार रविंद्र धंगेकर 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवजयंती निमित्त फिर्यादी आणि त्यांच्या गावातील शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगडावर गेले होते. तिथून शिवज्योत घेऊन येत असताना शुक्रवारी (दि.10)पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या टेम्पोला पाठीमागून नामदेव पाटोळे याच्या (Pune News) ताब्यातील ट्रकने धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या टेम्पोसोबत असलेले 32 जण जखमी झाले. ट्रकच्या धडकेमुळे टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो समोरच्या दुचाकीला धडकला. दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. या अपघातात एकूण 24 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात घडल्यानंतर ट्रक मालकाने, आम्ही तुमच्या मुलांना काही मदत करणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. अपघातातील जखमींना तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यावरून गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.