BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या ‘लव’ला कांस्य तर,’तपस्या’ला सुवर्ण पदक

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या तपस्या अशोक मतेला 12 वर्षाखालील मुलींच्या 32 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळाले. तर, लव महेश भुसारी याला 12 वर्षाखालील मुलांच्या 32 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि 14 वर्षाखालील मुलांच्या 32 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळाले.

पुणे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा रविवारी (दि. 7) महाराष्ट्र मंडळ पुणे येथे पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिवदुर्ग फिटनेसच्या दोन विद्यार्थ्यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला.

  • तपस्या अशोक मते या विद्यार्थिनीने 12 वर्षाखालील मुलींच्या 32 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले. तर, लव महेश भुसारी याने 12 वर्षाखालील मुलांच्या 32 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि 14 वर्षाखालील मुलांच्या 32 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.

दोघांनी मिळवलेल्या या यशाचे पुणे जिल्ह्यातून विविध स्तरातून कौतुक होत आहे. या यशामुळे या दोघांचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A1
.