-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शिवलिंग मेनकुदळे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची नियुक्ती झाली आहे. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे.

याअगोदर त्यांनी शिरवळ येथील श्रीपतराव कदम महाविद्यालय या ठिकाणी प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांनी मराठी विषयांमधून एम. एम., एम. फिल., पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, रयत शिक्षण संस्थेत गेली चोवीस वर्षापासून मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने एम.फिल., पीएच.डी.च्या आठ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये त्यांचे एकोणीस रिसर्च पेपर प्रकाशित झाले असून, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सेमिनार कॉन्फरन्समध्ये एकोणीस रिसर्च पेपरचे वाचन केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सेमिनार, कॉन्फरन्समध्ये सव्वीस ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला होता.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी विविध समित्यांवर कार्य केले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अभयसिंह भोसले स्मृती शैक्षणिक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षण क्रांती पुरस्कार, बॅरिस्टर पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.