Pune : पुणे शहरात एकतरी मतदारसंघ मिळावा, यासाठी शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – जनतेची कामे करायला शिवसेनेचा आमदार असणे आवश्यक आहे, त्यासाठी पुणे शहरामध्ये शिवसेनेला एकतरी मतदारसंघ मिळावा, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने आज दुपारी आंदोलन करण्यात येणार आहे.

अलका चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा प्रमुख रमेश बप्पू कोंडे आणि विधानसभा प्रमुख नितीन वाघ यांनी केले आहे.

पुणे शहरात आठही मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट) ला एकही जागा सोडली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.