Pune : संगमवाडी पुलावर शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात

एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवडवरून भुसावळच्या (Pune) दिशेने जाणार्‍या शिवशाही बसचा संगमवाडी पुलावर ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. त्यानंतर ती बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडवरून भुसावळच्या दिशेने mh 09 em 2593 या क्रमांकाची बस आज सकाळच्या सुमारास 25 प्रवाशांना घेऊन जात होती.ती बस संगमवाडी पुलावर आल्यावर बसचा ब्रेक झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.

Bhosari : संत निरंकारी मिशनद्वारा बाल संत समारोहाचे आयोजन

त्यावर बस चालकाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.पण समोर खूप वाहन होती.त्या वाहनांना धडक बसण्याची शक्यता होती.त्यामुळे रस्त्याच्या कडेला बस घेण्याचा प्रयत्न केला असता.ती बस झाडावर जाऊन धडकली.या घटनेमध्ये बसच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात (Pune) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.