Pune : कात्रज घाटात शिवशाही बस 50 फूट खोल दरीत कोसळली; बसमध्ये 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती, बचावकार्य सुरू

एमपीसी न्यूज – पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात सुमारे पन्नास फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एकूण 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस पुणे ते सांगली मार्गावरील आहे. पुण्याहून निघाल्यानंतर कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर शिंदेवाडीजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस पन्नास फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये 40 ते 50 प्रवासी असल्याची ही प्राथमिक माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.