Pune : धक्कादायक ! 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 99 नवे रुग्ण, 61 जणांना डिस्चार्ज

मागील 3 दिवसांत 26 नागरिकांचा बळी Pune: Death of 12 corona patients; 99 new patients, 61 discharged today

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट पुण्यात गडद होत आहे. आज, शुक्रवारी दिवसभरात कोरोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच 99 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होत नाही, असेही दिसून आले आहे. दरम्यान, 61  रुग्ण ठणठणीत बरे झाले त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरात 76  क्रिटिकल रुग्णांवर उपचार चालू असून त्यात 12  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एकूण पॉझिटिव्ह संख्या 2,245, अॅक्टिव्ह 1,377,  आत्तापर्यंत कोरोनाबाधित 137  रुग्णांचे मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत कोरोनामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी तब्बल 12 नागरिकांचा या रोगामुळे बळी गेला.

बुधवारी 7 आणि गुरुवारीही 7 नागरिकाचा कोरोनाने बळी घेतला होता. मागील 3 दिवसांत 26 नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 137 मृत्यू झाले आहे. दिवसभरात 99 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

76 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2245 झाली आहे. डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 1966 आणि ससूनमध्ये 279 रुग्ण आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1377 आहे.

येरवडा येथील 85 वर्षीय महिलेचा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औंध येथे, घोरपडी येथील 76 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 70 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, पद्मावती येथील 82 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 48 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

तर पद्मावती येथील 67 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिंग होममध्ये, ताडीवाला रोड भागातील 48 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढवा रोड भागातील 60 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, रस्ता पेठेतील 67 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर भागातील 70 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, तळेगाव ढमढेरे येथील 60 वर्षीय महिलेचा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल औंध येथे कोरोनामुळे मृत्यू झाला. आज 8 महिला आणि 4 पुरुषांचा या रोगामुळे बळी गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.