_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : धक्कादायक ! उपचारासाठी आलेल्या तरूणीवर डॉक्टरचा बलात्कार

  कोंढवा परिसरातील घटना, आरोपी डॉक्टरविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : Shocking! Doctor raped a young woman who came for treatment

एमपीसीन्यूज  : पंचकर्म उपचार करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर डॉक्टरने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.  याप्रकरणी  तरुणीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. सुरेश वाडीयार असे आरोपीचे नाव आहे. ही घटना मार्च ते मे या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर हा पीडित तरुणीचा फॅमिली डॉक्टर आहे. कोंढवा परिसरात त्याचे आयुर या नावाने क्लिनिक आहे. 20 मार्च रोजी पीडित तरुणी उपचारासाठी त्याच्या क्लिनिकमध्ये गेली होती.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी त्याने क्लिनिकमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. ही घटना क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत त्याने पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार केला.

दरम्यान, डॉक्टरकडून वारंवार होणाऱ्या बदनामीच्या धमकीला कंटाळून पीडित तरुणीने बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दिली.

पोलिसांनी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बोराटे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.