Pune : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरी चालकाचा खून

एमपीसी न्यूज- सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर टपरी चालकाच्या पोटात कोयत्याने वार करून खून करण्यात आला. पुण्यात बाणेर रस्ता परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

संतोष कदम (वय 32) असे खून झालेल्या टपरीचालकाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील डी-मार्ट जवळ संतोष कदम याची टपरी आहे. रविवारी संध्याकाळी तीनजण या टपरीवर आले. त्यांनी संतोष यांनी सिगारेट मागितली. संतोष यांनी त्यांना सिगारेट देऊन पैसे मागितले. सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपीने संतोष कदमला मारहाण केली. तर एकाने कोयत्याने त्याच्या पोटात वार केले..यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याच्या मृत्यू झाला..

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी त्वरित तपास करीत या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. चतु:शृंगी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.