Pune : पुण्यात तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा पुणे व्यापारी असोसिएशनचा निर्णय

किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर सुरू राहणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील दुकाने तीन दिवस बंद राहणार आहेत. किराणा, मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. 17, 18 आणि 19 मार्च असे 3 दिवस दुकाने बंद करण्याचा निर्णय पुणे व्यापारी असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, तीन दिवस दुकान बंद राहणार असल्याचे समजताच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.