BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा घेऊ नये का? -मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा सवाल

एमपीसी न्यूज- बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा घेऊ नये का?, बारामतीत 370 कलम लागू आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना विचारला. शनिवारी महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री पुणे शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, बारामतीत घोषणाबाजी करणारे फक्त सात लोक होते. सात लोकांवर लाठीचार्ज करावा लगतो का. ते पळून गेले. आमचे सात लोक पवारांच्या सभेत जाऊन घोषणा देऊ लागले तर एवढी का पायाखालची जमीन सरकलीय?. बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा कोणीच घेऊ नये का?. बारामतीत 370 कलम लागू आहे का? असे प्रश्न करत त्यांनी विरोधकांना आमच्याकडं त्यांनी यावं आणि सभा घ्यावी, असे आवाहनही केलं.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3