सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : पुणेकरांनी ‘कोरोना’ला घाबरू नये, नायडू रुग्णालय सज्ज – महापौर

एमपीसी न्यूज – पुणेकरांनी कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’ व्हायरसला घाबरू नये. या रोगावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे १०० बेडचे नायडू रुग्णालय सज्ज आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी या रुग्णालयाची गुरुवारी पाहणी केली. 

पुणे विमानतळावर येणार्‍या प्रत्येक नागरिकाची कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येत आहे. आजाराची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला तातडीने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात येते. मागील दीड महिन्याच्या कालावधीत ८२ संशयित रुग्ण दाखल झाले.

या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी या आजाराविषयी घाबरू नये. गुरुवारीही चार संशयित रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरातील ११ खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार ठेवण्यात आले आहेत. लवकरच नायडू रुग्णालयातही अतिदक्षता विभागाची निर्मिती केली जाणार असल्याचे महापौर म्हणाले. तर, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

spot_img
Latest news
Related news