Pune : महापालिकेने वापरलेल्या पाण्याची मोजमाप करू नये?; साडे चार टीएमसी पाणी जादा मिळण्याची प्रशासनाला आशा

एमपीसी न्यूज – यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला आहे. तरीही धरणांत धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने वापरलेल्या पाण्याची मोजमाप करण्यात येऊ नये. त्यामुळे साडेचार टीएमसी पाणी महापालिकेला पुन्हा मिळण्याची आशा आहे. पण, या प्रकरणाचा पाठपुरावा करणार कोण, हा खरा प्रश्न आहे.

नगरसेवकांनी त्या संबंधीची मागणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29. 15 टीएमसी आहे. धरणांत अतिरिक्त पाणी साठविता येत नसल्याने 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी नदीतून सोडण्यात आले. हे पाणी पुणेकरांना मिळाले असते तर उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नसती. जलसंपदा विभाग मात्र ही मागणी मान्य करणार का? हा खरा प्रश्न आहे.

सध्या महापालिका धरणांतून रोज 1350 एमएलडी पाणी उचलते. 800 एमएलडी पाणी रोज उचलले तर निम्म्या पुण्याला पाणीच मिळणार नाही. सध्या पिंपरी – चिंचवड शहरात पाणीकपत सुरू आहे. पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला तर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पुणेकरांना दररोज पाणी मिळण्याची सवय आहे. अन्यथा, आरडाओरड सुरू होते. त्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेऊन पाणीकपात न करण्याचे आदेश दिले आहेत.

धरणांतून दररोज 1350 एमएलडी पाणी घेऊ द्या, असे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे पाणी काही कट होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.