Pune : शहरात शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवा आणि प्रति स्पीड ब्रेकर 100रुपये बक्षीस मिळवा – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात शास्त्रीय मानकांप्रमाणे (Pune )असलेले स्पीड ब्रेकर दाखवा आणि प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस मिळवा, असे आव्हान सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिले आहे.

रस्ते विभाग प्रमुख, पुणे महापालिका यांना यासंदर्भातील निवेदन (Pune )देण्यात आले आहे. आपल्या अभियंत्यांनी पायी चालत रस्त्यांचा सर्व्हे केल्याचं वृत्तपत्रांत वाचले.

यातून शास्त्रीय मानकांप्रमाणे नसलेले स्पीड ब्रेकर महापालिका दुरुस्त करणार असल्याचेही वाचले. खरं तर उच्च न्यायालयाने २००५ साली दिलेल्या आदेशाचे अनुपालन करुन सर्व अशास्त्रीय स्पीड ब्रेकर उखडून टाकणे आवश्यक आहे.

Pimpri: शिक्षण प्रसारक मंडळींच्या शाळेत शिवजयंती निमित्त अश्वारोहण प्रात्यक्षिक

आमच्या मते आज संपूर्ण पुणे शहरात एकही स्पीड ब्रेकर शास्त्रीय मानकांप्रमाणे नाही. आमचे आपल्या विभागास जाहीर आव्हान आहे की, आपण पुणे शहरात मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावेत, आम्ही अशा प्रत्येक स्पीड ब्रेकर मागे शंभर रुपये बक्षीस देऊ करत आहोत, असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.

खरं तर आपल्या अभियंत्यांनी केलेला सर्व्हे तातडीने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला पाहिजे, जेणेकरुन नागरिकही त्याची सत्यासत्यता पडताळून पाहू शकतील. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवण्यासाठी पुण्यातील सर्व अशास्त्रीय स्पीड ब्रेकर तातडीने उखडून टाकण्यासाठी पावले उचलावीत आणि यापुढे शहरात एकही स्पीड ब्रेकर अशास्त्रीय पद्धतीने बांधला जाणार नाही याची काळजी घ्यावी. नियमाप्रमाणे प्रत्येक स्पीड ब्रेकर बांधताना वाहतूक पोलीसांची परवानगी घेणे आवश्यक आहे याचीही दक्षता घ्यावी.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.