BNR-HDR-TOP-Mobile

Pune : स.प., इंदिरा कॉलेजचा मोठा विजय; सृजन करंडक 2019 फुटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – इंदिरा कॉमर्स कॉलेज आणि स.प. महाविद्यालय संघांनी सृजन करंडक 2019 फुटबॉल स्पर्धेत मोठा विजय मिळवून पहिला दिवस आपल्या नावावर केला.

पुणे पोलिस मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या विभागात स.प. महाविद्यालयाने एसएनबीपी कॉलेजचा 5-2, तर इंदिरा कॉलेजने जेएसपीएम नऱ्हे कॅम्पस संघाचा 7-0 असा पराभव केला.

पहिल्या सामन्यात एसएनबीपी संघाने आठव्याच मिनिटाला गोल करून संघाला झकास सुरवात करून दिली. समय मुखर्जी याने आठव्या मिनिटाला हा गोल केला. पण, त्यानंतर आकाश वाडेकर याने 19, 23 आणि 27व्या मिनिटाला सलग गोल करून स.प.ला 3-1 असे आघाडीवर नेले. स्पर्धेतील ही पहिलीच हॅट्ट्रिक ठरली. त्यानंतर हृषिकेश खेडकरने 29 आणि उत्तरार्धात अभिषेक नगरकर याने 31व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्‍चित केला.

दुसऱ्या एका सामन्यात शुभम पोटघनने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंदिरा कॉलेजने जेएसपीएम नऱ्हे टेक्‍निकल कॉलेज संघाला 7-0 असे निष्प्रभ केले. त्यांच्याकडून आदित्य अय्यरने दोन, जगत राज, शॉन अर्लंड यांनी एकेक गोल नोंदवला. त्यापूर्वी, जेएसपीम संघाने मनोज पाटीलच्या दोन गोलच्या जोरावर झील कॉलेजचा 3-0 असा पराभव केला होता. अन्य एक गोल रोहन राऊतने केला.

 • निकाल :-
  मुले – स.प. महाविद्यालय 5 (आकाश वाडेकर 3, हृषिकेश खेडेकर, अभिषेक नगरकर) वि.वि. एसएनबीपी 2 (समय मुखर्जी, गणेश पाटील).
  एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी 0 (4) (रिषभ पुटी, रिषभ मकवाना, करण अधिकारी, तेजस पतंगे) वि.वि. एएसएम कॉलेज ऑप कॉमर्स, सायन्स आणि इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी 0 (2) (विनायक अनमोल, चंदन मंडल).
  टिकाराम जगन्नात कॉलेज वि.वि. जॉन बॉस्को कॉलेज (पुढे चाल).
  जेएसपीएम कॉलेज 3 (मनोज पाटील 2, रोहन राऊत) वि.वि. झील कॉलेज 0.
  इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स 7 (शुभम पोटघन 3, आदित्य अय्यर 2, जगत राज, शॉन अर्लंड) वि.वि. जेएसपीएम लऱ्हे टेक्‍निकल कॅम्पस 0.
HB_POST_END_FTR-A2

.