Pune : रांका ज्वेलर्सने बनवली ‘चांदीची वीट’; राममंदिराच्या भूमी पूजनासाठी पाठवली अयोध्येला  

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडणार आहे. 'Silver Brick' made by Ranka Jewelers; The land of Ram temple was sent to Ayodhya for worship

एमपीसी न्यूज – राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडणार आहे. या भूमिपूजनासाठी  विविध वस्तू पाठवण्याचा ओघ सुरू झाला आहे. अशातच पुण्यातील रांका ज्वेलर्सने ‘जय श्रीराम’ लिहिलेली शुध्द चांदीची वीट तयार केली आहे. नुकतीच ही वीट पुण्याहून अयोध्येच्या दिशेने रवाना झाली आहे. 

रांका ज्वेलर्सचे मानव रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विटेवर मोती, पोवळे, लसण्या, पुष्कराज, गोमेद, माणिक, हिरा, पाचू, नीलम अशी नवग्रहांची नवरत्ने देखील जडविण्यात आली आहेत.

या वैशिष्ट्यपूर्ण चांदीच्या विटेचे वजन 1011 ग्रॅम असून ही वीट मानव रांका यांच्या मार्गदर्शनाखाली 2 कारागिरांनी 2 दिवसात निर्माण केली आहे.

अयोध्येतील ऐतिहासिक भूमि पूजनासाठी  रांका ज्वेलर्सच्या हातून चांगले कार्य घडल्याचे  समाधान असल्याचे रांका ज्वेलर्सचे मानव रांका व संपूर्ण रांका परिवाराने व्यक्त केले आहे.

दरम्यान, उद्या होणा-या भूमिपूजनाचा उत्साह शिगेला पोहोचला असून संपूर्ण आयोध्या भूमिपूजनासाठी सज्ज झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.