Pune: ‘सिंगल वार्ड’ पद्धत महाराष्ट्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह -अ‍ॅड.अभय छाजेड

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘सिंगल वार्ड’ पद्धत राबवून निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. त्यामुळे स्थानिक व्यक्तींना योग्य ते प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यांना महापालिकेच्या सुविधा मिळण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी म्हटले आहे.

या निमित्ताने ‘सिंगल वार्ड’ पध्दत राबवित असताना निवडणुका या ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने’ न घेता मतदान पत्रिकेवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही छाजेड यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनावर येणार ताण व कार्यकर्त्यांना होणार त्रास हा वाचणार आहे. शिवाय निवडणुकाही पारदर्शक पध्दतीने होण्यास फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.