BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सिंहगडाचा घाटरस्ता आजपासून एक महिना पर्यटकांसाठी बंद

0

एमपीसी न्यूज- सिंहगड घाट रस्त्यावरील दरड पडत असलेल्या भागात संरक्षण जाळ्या बसविण्याचे काम आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आज 2 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

गडावर जाण्यास इच्छुक पर्यटकांनी पायवाटेचा वापर करावा असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सिंहगड घाट रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळतात. पर्यटक गडावर अडकून पडतात यामुळे आता एक महिना काम होईपर्यंत रस्ता बंद राहणार आहे.

 

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3