Pune : सिंहगड रस्त्यावरील खुनप्रकरणातील चारही आरोपी अल्पवयीन

एमपीसी न्यूज -सिंहगड रस्त्यावरील फनटाइम चित्रपटग्रहजवळ रविवारी रोहन साळवी (वय 27) या तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निघृण खून करण्यात आला होता. सिंहगड पोलीसांनी तपास करत यातील चार आरोपींना ताब्यात घेतले असून हे चारही आरोपी अल्पवयीन आहेत. यामुळे बालगुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत रोहन हा 31 डिसेंबरच्या रात्री रोहन दारू पीत बसले होते. यावेळी एकाला पाय लागल्याने झालेल्या भांडणातून रोहनने एकाचा शर्ट फाडला होता. हाच राग मनात धरून या अल्पवयीन आरोपीनी त्याचा खून केला. आरोपींनी रोहन याला अतिशय निघृनपणे मारले. चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याचा चेहरा विद्रुप केला.

मागच्याच आठवड्यात सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव बुद्रुक येथे झालेल्या खून केल्याने पोलिसांनी तीन अल्पवयीन ताब्यात घेतले होते. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस बालगुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याची चिन्ह दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.