Pune : बुधवार पेठेतील गोडावून फोडून 25 लाखांची चोरी करून फरार झालेल्या सहा आरोपींना ठोकल्या बेड्या; युनिट-1,गुन्हे शाखेची कामगिरी

एमपीसी न्यूज – पुणे येथील बुधवार पेठेतील ईलेक्ट्रिक सामानाचे गोडावून फोडून सुमारे 25 लाखांची चोरी करून फरार झालेल्या सहा आरोपींना मुद्देमालासह युनिट-1 ने जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे 30,60,878 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो आणि मोबाईलही जप्त केले आहेत.

याप्रकरणी अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज (वय 20,रा. सध्या 226 मंगळवार पेठ पुणे मुळगाव उत्तर प्रदेश), विनयकुमार विरेद्रनारायण सरोज (वय 20, रा. पाटील ईस्टेट झोपडपटटी शिवाजीनगर पुणे मुळगाव उत्तर प्रदेश), राहुल रामसजीवन सरोज (वय 19, रा. पाटील ईस्टेट झोपडपटटी शिवाजीनगर पुणे मुळगाव उत्तर प्रदेश), निरजकुमार मेईघा सरोज (वय 19), सुनीलकुमार शामसुंदर सरोज (वय 24), अरविंदकुमार प्यारेलाल सरोज (वय 20, तिघेही रा. रा. 226 मंगळवार पेठ पुणे मुळगाव उत्तर प्रदेश) अशी केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ईलेक्ट्रिक सामानाचे बॉक्स किंमत 26,60,878 रुपये आणि गुन्हयात वापरलेला टेम्पो किंमत 3,00,000 रुपये तसेच आरोपींचे 6 मोबाईल किंमत 1,00,000 रुपये असा सुमारे 30,60,878 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  केला आहे.

  • याबाबत दीपक रमेश वाधवानी (रा. डी एस के फ्रांजीपानी को ऑप हौ सोसायटी, साधु वासवानी चौक, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार युनिट-1,गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, दीपक रमेश वाधवानी यांचे ईलेक्ट्रिक सामानाचे 51 बुधवार पेठ पुणे येथील गोडावून दिनांक ०६/०७/२०१९ रोजी रात्रौ ८.३० वा ते दिनांक ०८/०७/२०१९ रोजी 3.30 वाजताच्या दरम्यान बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गोडावूनच्या दुस-या मजल्यावरील खिडकीची लाकडी फ्रेम तोडून अनधिकृतपणे प्रवेश करुन गोडावूनमधील सुमारे 24,60,000/- रुपयचे ईलेक्ट्रिक सामानाचे बॉक्स घरफोडी चोरुन नेले. याबाबत दीपक रमेश वाधवानी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या दाखल गुन्हयाचा युनिट-1,गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु करण्यात आला.

  • घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहा.पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, उत्तम बुदगुडे, हनुमंत शिंदे यांनी स्टाफसह भेट दिली. घटनास्थळावरुन माहिती घेतली. स्थानीक चौकशी केली. युनिट-1 चे अधिकारी आणि कर्मचारी यांची तपास पथके तयार करुन यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सीसीटिव्ही फुटेज तपासले. तसेच गुन्हेगारांनी वापरलेल्या वाहनाची माहीती व तांत्रिक माहीतीच्या आधारे वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपींचा शोध सुरूच ठेवला.

याबाबत तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील आणि पोलीस हवालदार योगेश जगताप, पोलीस नाईक सुधाकर माने यांना आरोपींनी वापरलेला पॅगो टेम्पो मिळाला. त्याचे चालकाकडे तपास केला असता तो टेम्पो हा त्याचे प्रतापगड, उत्तर प्रदेश येथील गावाकडील साथीदार यांनी मिळून घरफोडीसाठी वापरल्याचे सांगितले. या टेम्पोचा मुळ नंबर एमएच-12-क्युआर-7824 हा होता. त्यांनी नंबर आणि टेम्पोचा रंग बदलून तो गुन्ह्यात वापरला. गुन्हा केल्यानंतर पुन्हा टेम्पोचा मूळ आरटीओ नंबर टाकल्याचे सांगितले.

  • याप्रकरणी अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज, विनयकुमार विरेद्रनारायण सरोज, राहुल रामसजीवन सरोज, निरजकुमार मेघाई सरोज, सुनीलकुमार शामसुंदर सरोज, अरविंदकुमार प्यारेलाल सरोज यांना अटक केली असून त्यांच्याकडून ईलेक्ट्रिक सामानाचे बॉक्स किंमत 26,60,787रुपये आणि गुन्हयात वापरलेला टेम्पो किंमत 3,00,000 रुपये तसेच आरोपींचे 6 मोबाईल किंमत 1,00,00 रुपये असा सुमारे 30,60,787 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.