BNR-HDR-TOP-Mobile

Pune : नऊ महिन्यात एक लाख फुकट्या प्रवाशांकडून सव्वा सहा कोटींचा दंड

पुणे रेल्वे मंडळाची कारवाई

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे मंडळामध्ये एप्रिल ते डिसेंबर 2018 या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये 1 लाख 13 हजार विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांकडून 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे रेल्वे मंडळाच्या पुणे-मळवली, बारामती, मिरज, कोल्हापूर विभागांमध्ये करण्यात आली.

पुणे रेल्वे मंडळाच्या सर्वच विभागांमध्ये रेल्वे प्रशासनाची विविध प्रकारे कारवाई सुरु आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण 2 लाख 50 हजार प्रकरणांमध्ये रेल्वे प्रशासनाने 12 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये 1 लाख 13 हजार विना तिकीट प्रवास करणा-या प्रवाशांकडून 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण 2 लाख 14 हजार प्रकरणांमध्ये 11 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. मागील वर्षीच्या तुलनेत एक कोटींचा अधिक दंड जास्त वसूल करण्यात आला असून 36 हजार प्रकरणांमध्ये देखील वाढ झाली आहे.

प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन रेल्वे स्थानकावर प्रवेश आणि प्रवास करावा. विनातिकीट प्रवास केल्यास 250 रुपये दंड घेण्यात येईल. प्रवासात निश्चित वजनापेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन जात असताना त्याचे देखील तिकीट घ्यावे. अन्यथा सहापट दंड वसूल करण्यात येईल. लगेज बुक करण्याची सुविधा सर्व रेल्वे स्थानकांवर आहे. नागरिकांनी रेल्वेच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी केले. यावेळी अप्पर रेल्वे मंडळ व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.