Pune : सहा उच्चभ्रू प्रवाशांचा महापालिकेच्या रुग्णालयात राहण्यास नकार!; स्व-खर्चाने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यास पसंती

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चे संकट पुण्यात गंभीर होत आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये त्यामुळे विदेशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावरून पुणे महापालिकेच्या थेट विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. मात्र, शुक्रवारी 6 उच्चभ्रू प्रवाशांनी महापालिकेच्या कक्षात न जाता स्व-खर्चाने विमाननगर भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यास पसंती दिली.

या प्रवाशांना पुढील 14  दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून दिलेल्या हॉटेलमध्ये हे प्रवासी थांबले आहेत.

आरोग्य विभागामार्फ सणस मैदान क्रीडासंकुल हॉस्टेल येथे १८०, लायगुडे हॉस्पिटल सिंहगड रस्ता येथे ६० आणि खेडेकर रुग्णालय बोपोडी येथे ५० खाटांचे सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सणस मैदान कक्षात ११४ आणि लायगुडे हॉस्पिटल येथील कक्षात २ असे एकूण ११६ प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

दिनांक 20 मार्च रोजी 116 जणांना पुणे पालिकेच्या विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) ठेवले गेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर या प्रवाशांना घरी सोडण्यात येणार आहे. या प्रवाशांमध्ये कोणाला कोरोनासंबंधित लक्षणे आढळल्यास डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.