Pune: पुण्यात सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, दोन महिलांना स्वारगेट बस स्थानकावरून अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील बुधवार पेठेतून सहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या(Pune) दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी स्वारगेट एसटी बसस्थानकातून अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) घडली. 

नाझमा बिलाल शेख (वय 43) आणि रेणू दिलीप राठोड (वय 41, दोघी रा. ढमढेरे बोळ, बुधवार पेठ) अशी (Pune)अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सहा वर्षीय मुलगा सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेतला. परंतु तो न आढळल्याने त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून तपास सुरू केला.

त्यावेळी तपास पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन अनोळखी महिला रिक्षातून संशयास्पदरीत्या जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या रिक्षाच्या क्रमांकावरून रिक्षाचालकाकडे चौकशी केली.रिक्षातून मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलांची ओळख पटवली. त्यावेळी त्या दोघीजणी बुधवार पेठेत राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाझमा शेख हिला ताब्यात घेतले.

Vadgaon Sheri: मुलीने मित्राच्या मदतीने केला आईचा खून, बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याचा केला बनाव

तपासादरम्यान तिने अपहरण केलेला मुलगा दुसऱ्या महिलेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी स्वारगेट एसटी बस स्थानकाच्या परिसरात पाळत ठेवली होती.

रेणू राठोड ही महिला शनिवारी (दि.6) एका लहान मुलासह फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिला अटक करून अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.